जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात त्याचे पडसाद उमटले. आव्हाड आपल्या निवासस्थानी दाखल होताच संतप्त कार्यकर्त्यानी ठाण्यातील पूर्व दृतगती महामार्गासह मुंब्र्यातील अमृतनगर येथे रास्ता रोको केला. तसेच या हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला. यावेळी आव्हाड समर्थकांनी राज्य सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.