ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

महारेरा चा आदेश ग्राहकांना संजीवनी बुटी सारखा ठरेल–बाबूभाई भवानजी

  मुंबई/ गृहनिर्माण क्षेत्रातील डेव्हलपमेंट ही आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही त्यामुळे घर घेणाऱ्या ग्राहकांची अनेक वेळा फसवणूक होत असते .आयुष्यभराची कमाई घर विकत घेण्यात घालवायची आणि नंतर फसवणूक व्हायची.हा प्रकारच भयंकर असून अशाच एका प्रकरणात महारेराने ग्रहकांचे हित साधणारा एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे त्यानुसार पुनर्विकास करताना काही कारणाने सोसायटीने विकासक बदलला तर विकासकाने विकलेल्या घरांची जबाबदारी त्या सोसायटीवर असेल आणि तिथे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी सोसायटीची असेल अशावेळी विकासक जरी बदलला तरी त्या प्रकल्पात घर बुक करणाऱ्या ग्राहकाला घर किंवा पैसे परत करण्याची जबाबदारी अर्थातच सोसायटीची असेल अशी तरतूद नव्या आदेशात करून महारेराणे ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे  मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजपा नेते बाबूभाई भवानजी यांनी या आदेशाचे स्वागत केले आहे.स्वतः बाबूभाई मुंबई आणि आसपासच्या परिसरात लोकांना माफक दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या आरजू या संस्थेचे विश्वस्त आहेत.बाबूभाई यांनी याबाबत अंधेरी येथील एका प्रकरणाचा हवाला देताना सांगितले की 2०१५ मध्ये अंधेरी(पू) येथील एका पुनर्विकास प्रकल्पात पाच ग्राहकांनी घरे खरेदी केली होती. प्रापर्टी डील मध्ये ते ग्राहक  आणि विकासक यांच्यात करार झाला होता. पण पाच वर्ष झाली तरी त्या ग्राहकांना त्यांचे घर मिळाले नाही म्हणून त्यांनी रेराकडे तक्रार दाखल केली.यावेळी झालेल्या सुनावणीत विकासकाकडून सांगण्यात आले की सोसायटीने मला या प्रकल्पातून वेगळे केले असल्याने मी ग्राहकांना त्यांच्या घराची चावी कशी काय देऊ शकतो ? मात्र सुनावणी नंतर महारेराणे सोसायटीला ग्राहकांच्या हिताचे रक्षा करण्याचे आदेश दिले हा आदेश म्हणजे सोसायटी आणि विकासक यांच्या वादात विनाकारण फसलेल्या ग्राहकांसाठी संजीवनी बुटी सारख्या आहे असे बाबूभाई यांनी म्हटले  आहे.कारण काही प्रकल्पांमध्ये सोसायटी विकासक बदलताना नव्या विकासकाला जुन्या व्यवहाराची व्यवस्थित माहिती देत नाही आणि त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो.
error: Content is protected !!