अनिल देशमुख यांचा सीबीआय अहवाल लिक – देशमुखांच्या वकिलास ,सीबीआय अधिकान्यालाही अटक
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाचा सीबीआय अहवाल लीक केल्या प्रकरणी देशमुख यांचा वकील आनंद डागा आनी सीबीआय मधील एक सब इन्स्पेक्टर अभिजित तिवारी यांना अटक करण्यात आली असून सीबीआय न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यांची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनी जर तोंड उघडले तर अनिल देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.१०० कोटींच्या खंडणी प्रकरणी ई डी ने या पूर्वीच अनिल देशमुख यांना अनेक वेळा समन्स बजावले असून त्यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर छापेही टाकले होते