ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

दावूद वर 25 लाखाचे इनाम .


दिल्ली/ ज्याने मुंबईत बॉम्ब स्फोटाची मालिका घडवून 257 लोकांचा जीव घेतला ज्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर 200 कोटींचे इनाम लावले आहे त्या दावूद वर एन आय ए सारख्या तपास यंत्रणेने फक्त 25 लाखाचे इनाम लावले आहे एवढ्या कमी रकमेत दावूद चा ड्रायव्हर किंवा प्यून सुधा एन आय ए च्या हाती लागणार नाही अशी जनतेकडून एन आय ए आणि पर्यायाने केंद्र सरकारची लोक खिल्ली उडवत आहेत.
12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट झाले होते हे बॉम्ब स्फोट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय क्या मदतीने दावूद ने घडवले यात 257 लोकांचा मृत्यू झाला तर 1400 लोक जखम झाले होते या प्रकरणी दावूद सह 122 आरोपी होते त्यातील 105 आरोपी सापडले त्यातील काहीना फाशी तर काहींना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि तेंव्हा पासून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे यातील दावूद शकील,अनिस,जावेद चिकना आणि या कटाची अमालबजवणी करणारा टायगर मेमन याच्यासह अजून 20 आरोपी फरार आहेत आणि ते पाकिस्तानात आहेत भारत पाकचे संबंध चांगले नसल्याने गेल्या 30 वर्षांपासून हे आरोपी सापडू शकली नाहीत आता एन आय ए सारख्या मोठ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास आहे आणि एन आय ए ने आज या आरोपींची यादी जाहीर करून त्यांच्यावर इनाम लावले आहे त्यानुसार ज्या दाऊदवर अमेरिकेने 200 को टी इनाम लावले आहे त्यावर एन आय ए ने फक्त 25 लाख इनाम लावले आहे तर छोटा शकील वर 20 लाख अनिस,टायगर मेमन आणि जावेद चिकणावर फक्त 15 लाख एवढ्या कामी रकमेत दाऊद आणि त्यांच्या साथीदार यांची कोण माहिती देईल का त्यामुळे लोक या प्रकाराची आता खिल्ली उडवत आहेत .

error: Content is protected !!