ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

लव्ह जिहाद

जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे होते पण या देशाच्या दुर्दैवाने आज केंद्रात देव धर्म श्रद्धा आणि आस्था यांनी महत्व देणारे सरकार असल्याने धार्मिक विद्वेशाची भावना समाजात रुजायला लागली आहे लव्ह जिहाद हा त्याचाच एक भाग आहे मुस्लिम तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांचे शोषण करून नंतर त्यांना एक तर मारून टाकतात किंवा वेष्या व्यवसायात ढकलतात असे सांगितले जाते अर्थात हे काही शंभर टक्के खरे नाही पण त्याचबरोबर खोटेही नाही कारण अशा घटना घडत आहेत नुकतीच झारखंड मध्ये एकतर्फी प्रेमातून एका मुस्लिम तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार देताच त्याने तिला पेट्रोल ओतून जाळून मारले हा प्रकार निश्चितच भयानक आहे.अशावेळी आरोपीची धर्म किंवा जात न बघता त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हायला हवी .वास्तविक प्रेम आंधळे असते त्या मुळे प्रेम करणारे कुणाचा जात धर्म बघून प्रेम करीत नाहीत पण काही लोक केवळ एका विशिष्ट धर्मातील लोकांना अद्दल घडवण्यासाठी त्या धर्माच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर तिचे आयुष्य बरबाद करतात यालाच लव्ह जिहाद मानतात पण प्रेमाच्या नावाखाली अशा प्रकारचा हा लव्ह जिहाद धर्म विरोधी आहे आणि कुठलही धर्म असे घाणेरडे प्रकार करायला परवानगी देत नाही पण त्याच बरोबर लव्ह जिहादची दुसरी बाजूही तपासून बघायला हवी कारण ज्या हिंदू मुली मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतात त्या काही दूध खुल्या नसतात.चांगल्या आणि सुशिक्षित असतात त्यांना आपल्या आयुष्यातील बऱ्या वाईट गोष्टींची जाणीव असते मुस्लिम धर्मीय कट्टरपंथी असतात त्यांच्या बहुविवाह पद्धती असते त्याच बरोबर तीन वेळा तलाक बोलून पत्नीला त्याच्या आयुष्यातून सहजपणे बाहेर फेकून देण्याची पद्धत रूढ आहे शिवाय मुस्लिम महिलांवर इतरही बरेच निर्बंध असतात आणि हे ठाऊक असतानाही हिंदू मुली मुस्लिम तरुणांच्या प्रेमात का पडतात प्रेम आंधळे असेल तरी प्रेम करणारे डोळस असतात त्यांना जर त्यांच्या भवितव्याची चिंता नसेल तर त्याला कायदा आणि सरकार काय करणार?

आणि धार्मिक कट्टरता केवळ मुस्लिम धर्मातच आहे असे नाही तर हिंदू धर्मात सुधा उच नीच जात पात पहिली जाते त्यामुळे एखादी उच्च वर्णीय मुलगी दलितांच्या प्रेमात पडू शकतं नाही जात पंचायती त्यांना लग्नाची परवानगी देत नाहीत जातीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी लग्न केलं तर मुलीच्या कुटुंबातील लोक सैराट बनतात आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवून संसारात पाऊल ठेवणाऱ्या त्या जोडप्याची हत्या करतात हिंदू धर्मातील जातीय पद्धती आणि मुस्लिमांचा लव्ह जिहाद या दोन्ही गोष्टी संविधान विरोधी आहेत आणि आजच विज्ञान युगात अशा गोष्टींना कवडीचीही किंमत नाही आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीने प्रेमात जात धर्माला महत्व देऊ नये. आपला जोडीदार आपल्या योग्य आहे की नाही तो आयुष्यभर आपला सांभाळ करण्यासाठी पात्र आही की नाही या एकाच गोष्टीचा विचार करावा आणि पुढे पावूल टाकावे धर्माच्या नावाखाली सूडबुद्धीने एखाद्या मुलीचे आयुष्य बरबाद करणे हा जसा गुन्हा आहे तसाच जातीच्या नावाखाली प्रेमाला किंवा प्रेमी युगलाच्या लग्नाला विरोध करणे हा सुधा गुन्हा आहे

error: Content is protected !!