मराठवाड्यात पावसाचा हाहाकार नांदेड, बीड, लातूर हिंगोलीला रेड अलर्ट
नद्या ओव्हरफ्लो गावात , शहरात पाणी शिरून घरांचे
शेतीचे प्रचंड नुकसान
बीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के.एस. होसाळीकर यआणि दिली आहे. तसेच गोदावरी नदीच्या काठावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकत
लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. लातूरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आह जिल्ह्याला देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. येथील गोदावरी नदी व इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आले आहे. मूग, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परळी शहरासह १५ गावांना पानी पुरवठा करणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पानी वाण नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. याच सोबत परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. यामुळे पाणी आता सखल भागात असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये शिरत आह
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील बांगर नगर परिसरात असलेल्या मॉलमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले आहे. मॉलमध्ये आत्ताही डोक्याच्या वर पाणी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पत्त्याप्रमाणे मॉलमधील किराणा, फ्रीज काउंटर, असं साहित्य वाहून गेल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.