ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बजाज फायनान्सच्या पठाणी वसुली मुळे लोकांवर आत्महत्येची पाळी-बाबूभाई भवानजी .


मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्याच्या माने भोवती कर्जाचा फास घट्ट आवळतात आणि रानटी पद्धतीने कर्ज वसुलीसाठी त्याच्या मागे तगादा लावून त्याच्यावर आत्महत्येची पाळी आणतात त्यामुळे बजाज फायनान्स कडून सुरू असलेली ही आर्थिक पिळवणूक कुठे तरी थांबायला हवी असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवाणजी यांनी म्हटले आहे.
बाबूभाई पुढे म्हणतात गरीब मध्यम वर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी,लग्नासाठी,घरासाठी,किंवा रिक्षा,टॅक्सी,छोटे दुकान चालवण्यासाठी किंवा अन्य लघु उद्योगासाठी बजाज फायनान्स कडून कर्ज घेतात .ज्याचे व्याज २० टक्के किंवा त्याही पेक्षा अधिक असते.हे सर्व ठीक आहे पण कर्जाचे हप्ते दर महिन्याच्या २ तारखेला कर्ज घेणाऱ्याचा बँक खात्यातून कापून घेतले जात असताना एक दिवस जरी पुढे गेला तरी पाचशे किंवा त्याहूनही ज्यादा दंड आकारला जातो . नोटिसा पाठवल्या जातात आणि गुंड प्रवृत्तीच्या वसुली एजेंट घरी पाठवले जातात ते घरा समोर येवून कर्ज घेणाऱ्याचा कुटुंबातील महिलांशी अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलतात सर्वांसमोर अपमानित करतात त्यामुळे काहींनी आत्महत्या केल्या आहेत. हा सगळा प्रकार भयानक आहे बजाज कडून कर्ज घेणारे लोक प्रामुख्याने गरीब मध्यम वर्गीय असल्याने आणि हा सामान्य कर्मचारी असल्याने सगळ्यांचाच पगार काही १ तारखेला होत नाही त्यामुळे २ तारखेला तो बजाजचा हप्ता बँकेत कसा भरेल असा सवाल करून बाबूभाई यांनी पुढे म्हटले की बजाज फायन्यान्स कर्जाच्या हप्त्याची तारीख २ऐवजी ७किंवा१० तारीख ठेवायला हवी आणि एखाद्या महिन्यात कर्जाचा हप्ता चुकला तर त्याला किमान १५ दिवसांची तरी मुदत द्यायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंड प्रवृत्तीचे वसुली एजेंट घरी पाठवून कर्ज घेणाऱ्याचा कुटुंबातील महिलांना मुलाना त्रास देऊ नये कर्ज घेणारा हा सुधा माणूस आहे आणि अशा हजारो लाखो कर्जदाराच्या व्याजाच्या पैशावराच बजाजची हा पठाणी व्यवसाय सुरू आहे. हे त्यांनी विसरू नये कारण आता बजाजच्या या पठाणी वसुली विरुद्ध लोकांमध्ये असंतोष आहे त्याचा भडका उधळला तर बजाज फायन्यान्स बोजा बिस्त्रा गुंडाळावा लागेल असा इशारा देत बाबूभाई म्हणाले की भाजप सदैव अन्यायाच्या विरोधात लढत असल्याने जर बजाज कडून यापुढे गरीब मध्यम वर्गीय कर्जदरांवर अन्याय झाला तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बाबूभाई यांनी दिलाय .

error: Content is protected !!