ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

ओसाड गावची पाटीलकी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते की देशाला स्वातंत्र्य मिळाले की काँग्रेस पक्ष बरखास्त करून टाका त्यावेळी गांधीजींचे कुणी एकले नाही पण 75 वर्षांनी नियतीने आज अशी वेळ आणली आहे की काँग्रेस पक्षाला कुणी बरखास्त करण्याची आवश्यकता नाही काँग्रेस स्वतःच शेवटच्या घटका मोजत आहे आणि अशा पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! 125 वर्षाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसला गेल्या 2 वर्षात अध्यक्ष मिळू शकला नाही यातच सारे काही आले! काँग्रेस मध्ये आता पर्यंत गांधी घराण्याचे वर्चस्व होते आणि ते संपवण्यासाठी काँग्रेस मधल्या वयोवृध्द नेत्यांचा

जी २३ गट अग्रेसर होता त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हा गट अग्रेसर असेल असे वाटले होते पण असे झाले नाही . दिग्विजयसिंग यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटले तर अशोक गेहलोत यांनी अगोदरच शेपटी घातली होती . त्यांना आता राजस्थानमध्येच मुख्यमंत्रीपदावर राहायचे आहे. मग तसे होते तर कशाला एवढा गाजावाजा केला होता. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कुणी जरी नसला तर गांधी कुटुंबाच्या ताटाखालचे मांजर बनून राहणार माणूस अध्यक्षपदी हवा होता आणि त्यासाठीच शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज भारताचं गांधी कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि तात्काळ १० जनपथ वरून सूत्रे हलली आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले . आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधी कुटुंबियांना विरोध करणारे जी २३ मधील सर्व म्हातारबा खर्जेचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी हजार होते याचाच अर्थ गांधी कुटुंबियांचे वर्चस्व आणि दबदबा अजूनही पक्षात कायम आहे. पण तसे असेल तर मग विरोधाचे नाटक कशासाठी असा प्रश्न आता लोक विचारीत आहेत. शशी थरूर यांनी भलेही अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला असलातरी आता ते सांगत आहेत कि निवडणुकीची प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आपण अध्यक्षपदाची निवडणूक करवतोय याचा अर्थ काय ? याचा अर्थ एकाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा केवळ एक फार्स आहे . बाकी सर्व काही ठरलेले आहे. खरेच किंवा करावीशी वाटते या काँग्रेसवाल्यांनी . त्यांना स्वतःची अशी विचारशक्तीचा राहिलेली नाही गांधी कुटुबाच्या बाहेरचा माणूस अध्यक्षपद सांभाळू शकत नाही का १९९४ या काळात नरसिहराव अध्यक्ष होते त्यानंतर १९९६ ते १९९८ या काळात त्रिपाठी अध्यक्ष होते त्यांनीही पक्ष सांभाळला होता . मग आताच काय झाले दिग्विजय. गेहलोत किंवा थरूर अध्यक्ष झाले असे तर कुठे बिघडले असते असेही काँग्रेसला भवितव्य नाही तेंव्हा आता तरी गांधी कुटुंबीयांनी दुसर्यांना संधी द्यायला हवी होती .

error: Content is protected !!