शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न- बँकेचे मोबाईल ऍप कार्यरत
मुंबई/ सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली . या सभेला बँकेचे सर्व भागधारक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी बँकेचे मोबाईल ऍप काढून बँकेचे बहुसंख्य सभासद खातेदार याना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली . या सेवेचा खातेदारांना चांगला लाभ घेता येईल असा विश्वास अप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष बळवंतराव पवार, प्राचार्य अशोक चव्हाण , मुंबई बँक संचालक नंदकुमार काटकर ,पत्रकार अशोक शिंदे, संपादक किसनराव जाधव , रुपेश मोरे मान्यवर उपस्थित होते . सभेची प्रस्तावना जगन्नाथ देसाई यांनी केली तर आभार बँकेचे मॅनेजर प्रवीण शितोळे यांनी केले .