अनिल देशमुख यांना अटक होणार १२तास चौकशी
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक आणि आणि अन्य एका सहकाऱ्याला अटक केली तसेच देशमुख यांच्या घरावर आणि कार्यालयावर तीन वेळा छापे टाकले दरम्यान इडी ने देशमुखांच्या पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ते काल दुपारी इडी च्या कार्यालयात १२वाजता हजार झाले तेंव्हापासून रात्री १२वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .