ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुख यांना अखेर अटक


मुंबई/राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात १३तासांच्या चौकशी नंतर ई डी ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून देशमुख यांना मुद्दाम अडकवण्याचा आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे .
अनिल देशमुख यांना ई डी कडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयात आपली याचिका प्रलंबित असल्याचे सांगून ते ई डी समोर हजार होत नव्हते मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाल्यानंतर त्यांच्या समोर दुसरा पर्याय उरला नाही . अखेर सोमवारी दुपारी १२वाजता ते ई डी समोर हजार. झाले आणि तेंव्हा पासून सलग १३तास त्यांची चौकशी सुरू होती त्यासाठी ई डी चे उप संचालक सत्यव्रत कुमार स्वतः दिल्ली वरून आले होते मात्र देशमुख चौकशीला सहकार्य करीत नसल्याने अखेर त्यांना अटक करण्यात आली .

error: Content is protected !!