ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याविश्लेषण

आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !

55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक 

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य,  आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि आहुति चे सल्लागार श्री. योगेश वसंत त्रिवेदी यांनी सस्नेह भेट दिला तर त्याचवेळी मंत्रालयात या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांच्या मंत्रालयातील दालनात संपन्न झाले.  याप्रसंगी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी उपस्थित होते. उद्योजक विषयावर दिवाळी अंक आल्याचे पाहून आनंद वाटला. ‘आहुति’च्या टीमचे यानिमित्त कौतुक करावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक मेडिमेकचे मिलिंद चौधरी आहेत.

या दिवाळी अंकांमध्ये विविध उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्याचा ठसा उमटवणाऱ्या उद्योजकांच्या यशस्वी गाथांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सोबत काम केल्याचा अनुभव असणारे अंबरनाथ भूषण गणपत पाटील, लाकूड विरहित फर्निचरची निर्मिती करणारे मिलिंद चौधरी,.रेल्वे, मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये फॅब्रिकेशनची कामे करणारे शिरीष बेंडाळे, पितांबरी उद्योग समूहाची पुढची पिढी, अंबरनाथचे अर्थमंत्री विलास देसाई आदी लेखांचा या अंकामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादन देणारे ऑसम केक, मातृत्व, तसेच मुरबाड परिसरात शेकडो महिलांना रोजगार देणारा समृद्धी पापड उद्योग अशा अनेक प्रेरणादायी यशस्वी उद्योग गाथा या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. उद्योग विशेष दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अंबरनाथमधील अनुभवी कलाकार अनिल डावरे यांनी साकारले आहे. अंकाची मांडणी आकर्षक असून नाविन्यपूर्ण यशोगाथा असल्याने प्रकाशनानंतर काही वेळातच दिवाळी अंकाची पहिली आवृत्ती हातोहात संपली. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आहुति चे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. हा अंक डिजिटल स्वरुपात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिवाळी निमित्त पत्रकारांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी दैनिक ‘सामना’ च्या संपादिका सौ. रश्मी उद्धव ठाकरे, पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे, खासदार अनिल देसाई, श्री. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आय ए एस अकादमीचे विश्वस्त विजय कदम, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मिलिंद नार्वेकर, हर्षल प्रधान, दिलीप पांढरपट्टे, अनिरुद्ध अष्टपुत्रे, दयानंद कांबळे, भास्कर कोकितकर आदि मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!