ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले

शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघन
मुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहे
काल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात भाजपचा पराभव झाला .दादरा व नगर हवेलीच्या खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येमुळे रिक्त झालेल्या या जागेवर शिवसेनेने देलकर यांच्या पत्नी कला बेन देळकर यांना उमेदवारी दिली होती तर भाजपने महेश गावित यांना मैदानात उतरवले होते मात्र श्रीमती डेलकर यांनी ६० हजाराहून अधिक मते घेऊन भाजपचा पराभव केला दुसऱ्या राज्यातील हा शिवसेनेचा पहीलाच विजय आहे तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील देगललुर बिलोली मतदार संघातील पोट निवडणुकीत जितेश अंतपूरकर यांनी ७८ हजाराहून अधिक मात्र घेऊन भाजपचे सुभाष साबणे यांचा पराभव केला आणि पंढरपूर मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा कडला. तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या चारही जागा तृणमूल जिंकून आपला आजही करिश्मा कायम असल्याचे मताने दाखवून दिले हिमाचल प्रदेशातील प्रतिष्ठेची मंडी लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकली तसेच तिन्ही विधानसभा जागा जिंकल्या राजस्थानमध्ये काँग्रेसने बाजी मारली . केवळ एम पि मध्ये खांडवा लोकसभेची जागा आणि विधानसभेच्या दोन जागा भाजपला जिंकता आल्या कर्नाटक मध्ये काँग्रेस भाजपने एक एक जागा जिंकली तर तेलंगणात सत्ताधारी तृणमूल बाजी मारली ‘

error: Content is protected !!