ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल 4 आठवड्यानंतर

दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठा समोर आहे त्यावर आज सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे .
शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदरांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून बऱ्याच सुनावणी झाल्या.पण त्यावर निकाल लागला नाही . कारण शिंदे गट हा निर्णय मानायला तयार नाही त्यांचे म्हणणे आहे की बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने आहेत . शिवाय ज्या उपसभापती शिरवळ यांनी आमदारांना अपात्र ठरवले त्यांच्या विरुद्ध शिंदे गटांनी अविश्वासाच्या ठराव दिला होता . त्यामुळे त्यांचा निर्णय वैध ठरत नाही .दरम्यान घटना पीठाने दोन्ही कडेच्या लोकांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे .त्यामुळे आता चार आठवड्यांत सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे .

error: Content is protected !!