ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

५० बंडखोर वाढवणार महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी

मुंबई – येत्या २० ऑक्टोबरला होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणुकीत तब्बल ५० बंडखोर उभे असून हे बंडखोर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडच्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढवणार आहेत. सर्वाधि १९ बंडखोर भाजपचे असून त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आआहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी संपल्यानंतर आता सर्वच पक्षांपुढे बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. सोमवार (दि. ४ नोव्हेंबर) पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता दिवाळीच्या दिवसात बंडखोरांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. या बंडखोरीमुळे आपलाच उमेदवार पडण्याची भीती अनेकांना वाटत आहे. सोमवारच्या आधी बहुतेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतलेले असतील, असे दोन्ही आघाड्यांकडून सांगितले जात आहे.
जवळपास ५० उमेदवारांनी बंडखोरी केली असून त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे आहेत. यातही भाजपाचे सर्वाधिक १९ उमेदवार आहेत, तर त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे १६ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा केवळ एकच बंडखोर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक १० बंडखोर उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, तर उर्वरित चार उमेदवार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आहेत. याशिवाय मविआच्या घटक पक्षांनी १४ उमेदवार उभे केले आहेत. कुर्ला, दक्षिण सोलापूर, परंडा, सांगोला आणि पंढरपूर या प्रमुख मतदारसंघात बंडखोर निवडणुकीला उभे आहेत. काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या नातेवाईकांना निवडणुकीला उभे केले आहे.

error: Content is protected !!