ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

राजावाडी व भाभा रुग्णालयात मनमानी पद्धतीने कंत्राटी कामगार भरती ?

मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या  के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय  अधीक्षकांकडे असल्याने  येथे कंत्राटी कामगार भरतीत ऑनलाइन कंत्राटी पद्धत न अवलंबून स्वतःचे मनमानी  चालवली जात आहे .आपल्या परिचित सामाजिक संघटनांना काम मिळावे या पद्धतीने कंत्राटी कामगार पुरवण्याचे कंत्राट देणयातर्थाताच त्यात सेटिंग होत असणार हे वेगळे सांगायची गरज नाही . पण हे सर्व कशासाठी ? पालिकेचे आणि सत्ताधारी शिवसेनेचे याकडे लक्ष नाही का ? अशा पद्धतीने रुग्णालय सारख्या अत्यंत महत्वाच्या अशा सेवेत जर लेबर पुरविण्याच्या कंत्राटी कामात मनमानी होऊ लागली तर कदाचित चुकीची माणसे कंत्राटी कामगार म्हणून रुग्णालयात घुसखोरी करतील आणि त्याचा परिणाम त्या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर होईल म्हणूनच पालिका आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन अशा पद्धतीने ओळखीच्या सामाजिक संघटनांना कंत्राटे यांचे साटेलोटे याला  पायबंद घालन्याची गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अनेक संघटनेने केली आहे . उपायुक्त संजय कुराडे आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी  यांनी गांभीर्य पूर्वक लक्ष घालण्याची गरज आहे.

error: Content is protected !!