ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदी- शहा ठरवतील तो मुख्यमंत्रीआम्हाला मान्य असेल – एकनाथ शिंदे सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. मात्र मुख्यमंत्रिपदासह महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा कायम आहे. त्यातच आता भाजपने परस्पर शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे त्यानुसार शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे समजते . मात्र शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर मंत्रिपदे आणि महत्वाच्या खातेवात्पावरून सुधा महायुतीमध्ये वाद असल्याची चर्चा आहे. .
छोट्या मित्रपक्षांसह भाजपची संख्या १३७ वर पोहचलीय.. अजित पवारांनीही भाजपला पाठींबा दिलाय.. मात्र शिंदेंनी मुंबईतील बैठका रद्द करून दरे गावी जाण्याचा निर्णय घेत दबावतंत्र वापरल्याचं म्हटलं जात होतं. दुसरीकडे भाजपने शपथविधीची वेळ जाहीर करून शिंदेंना सूचक इशारा दिल्याचं म्हटलं जातं.तर दरे गावावरून परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यात कोणताही वाद नाही मोदी- सहा ठरवतील तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य असेल असे सांगून महायुती मधील बेबनावाच्या चर्चना पूर्णविराम दिला आहे.

error: Content is protected !!