पालिकेची पुन्हा टॅब वर ३८ कोटी ७२ लाखांची उधळपट्टी
मुंबई/ कोरोनाची तिसरी लाट आलीय रोज मुंबईत पाच ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत त्यांच्या उपचारांवर आत परचड खर्च करावा लागणार आहे असे असताना पालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी पालिका टॅब खरेदी करणार आहे .तब्बल १९४०१ टॅब खरेदी केले जाणार असून प्रत्येक टॅब ची किंमत१७,४०० रुपये इतकी आहे यापूर्वी पालिकेने ४४हजार टॅब खरेदी केले त्यातील कित्येक टॅब निकृष्ट दर्जाचे निघाल्याने पालिकेवर त्या वेळी मोठी टीका करण्यात आली होती .आणि आता पुन्हा टॅब खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे पालिका आजही तोट्यात आहे कोरोनावर आतापर्यंत २००० कोटींपेक्षा अधिक खर्च झालाय आणि आता पुन्हा कोरोणणे डोके वर काढल्याने पुन्हा तेवढाच किंवा त्याहीपेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता आहे असे असताना टॅब वर उधळपट्टी का हाच पैसा आरोग्य सेवेवर आणि खास करून कोरोोणाच्या साठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर भरपूर पैसा खर्च होणार आहे असे असताना आताच टॅब वर इतका खर्च का? यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत असा सवाल मुंबईकर जनता करीत आहे