ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या विरुद्ध ओबीसी मध्ये असंतोष


पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.
ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडुन दिली तसेच चूल आणि मुल या बंधनातून महिलांची सुटका करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळवून दिला त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती होती आणि जयंती दिवशीच त्यांच्या पुणे विद्यापीठाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार होते आणि विद्यापीठांचे कुलपती असलेल्या राज्यपालांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार होते पण आपल्याला दुसरे कार्यक्रम आहेत असे सांगून राज्यपाल भगतसिंग कोषरी यांनी या पुतळा अनवरणाच्या कार्यक्रमास येण्यास नकार दिला ही माहिती पुण्यात वाऱ्यासारखी पसरताच ओबीसी समाज संतप्त झाला आणि रस्त्यावर उतरला ओबीसी विद्यार्थी संघटनांनी या पुतळ्याजवळ राज्यपालांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले आणि राज्यपाल हटाव चां घोषणा दिले तसेच या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्नही केला पण पोलिसांनी त्यांना अडवले यावेळी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी दयानंद शिंदे यांनी सांगितले की ज्या माऊलीने महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला तिच्या पुतळ्याचे अनावरण करायला जर राज्यपालांना वेळ नसेल तर त्यांना या पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर राहण्याचा जराही अधिकार नाही .राजपाल हे राज्याचे प्रमुख आहेत की संघाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आता राज्यपालांच्या या कृति विरुद्ध संपूर्ण ओबीसी समाजात संताप उसळलेला आहे जो त्यांच्यासाठी तापदायक ठरू शकतोो.

error: Content is protected !!