ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त

मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेत
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांच्या बद्दलचा वाद निष्कारण काढला गेलाय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले. मराठा व्यापक संकल्पना होती. रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज . यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही. इतिहासकारांनी त्यांच्या बद्दल चांगले लिहून ठेवले आहे. स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते. कुठल्या इतिहासकाराने त्यांना धर्मवीर म्हणले नाही. जे शिवाजी महाराजांनी केले तेच पुढे संभाजी महाराजांनी केले, असं आव्हाड म्हणाले,

आव्हाडांनी म्हटलं की, सहा सोनेरी पानं यांत जे काही लिहिलंय ते वाचून पुन्हा वाद नाही निर्माण करायचा. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल “नाकारतां पुत्र, त्यांना मदिराचे व्यसन होते” असं लिहून ठेवलं. गोळवलकर यांनी “खंडोज्जी बल्लाळ यांच्या स्त्रीयांवर संभाजी महाराजांची वाईट नजर होती” असं लिहून ठेवलंय, असंही आव्हाडांनी सांगितलं.

आव्हाडांनी म्हटलं की,संभाजी महाराजांची माहिती कोणी दिली यांचे देखील पुरावे आहेत. अजित पवार यांना म्हणायचे वेगळे होते पण त्यांचा टोन वेगळा होता. मी जे सांगतोय ते सत्य अभ्यासू सांगतोय. भाजपाने जे आंदोलन केले म्हणून हे सगळं बाहेर घेवून आलोय. अजित पवार संभाजी महाराजांच्या विरोधात काहीच बोलले नाही. महापुरुषांना विशिष्ट धर्माचे लेबल लावायचे आणि बाजारात विकायला आणायचे. मराठ्यांबद्दल इतकं वाईट लिहिलंय त्या बद्दल आतापर्यंत का कोणी बोलले नाही, असंही आव्हाड म्हणाले.

error: Content is protected !!