ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महापालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार


मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं १४९ पैकी तब्बल १३२ जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे. या घवघवीत यशानंतर आता भाजपचा कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत.
महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महायुती ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतीच होती, असं यापूर्वीच सांगितलं आहे. त्याचमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शंभर टक्के सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत असं आमदार जगताप म्हणाले.
आम्ही स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यांनी आपण ज्या भाजप पक्षाचं प्रतिनिधित्व करतो,त्या पक्षाचे यापूर्वीपेक्षा जास्त संख्येनं नगरसेवक यावेळी निवडून आणण्याचा आमचा मानस असल्याचेही शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. जगतापांच्या या स्वबळाच्या संकेतांनंतर आता महायुतीतीस एकनाथ शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
उप मुख्यमंत्री अजित पवारांचे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला हजेरी लावल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाना काटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीटासाठी फिल्डिंग लावली होती. पण त्यांना त्यावेळी वेटिंगवरच ठेवण्यात आले.

error: Content is protected !!