ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण

मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या आणि तिथल्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे एक वेळ समजू शकते पण रेल्वे रुळा लगतच्या ज्या झोपड्या आहेत त्या रेल्वेसाठी धोकादायक आहेत. खास करून मुंबईच्या लोकल ट्रेन साठी जास्त धोकादायक आहेत कारण मुंबईच्या लोकल ट्रेन मधून रोज ७६ लाख लोक प्रवास करतात .अशावेळी जर काही पाकिस्तानी किंवा बांगलादेशी दहशतवाद्यांनी लोकल ट्रेन बॉम्ब ने उडवण्याचा कट रचला तर त्यांच्यासाठी त्या कटाची शोध करणे अवघड आहे  .कारण या झोपडपट्ट्यांमध्ये ते कितीही दिवस लपून राहू शकतात आणि कधीही रात्री अपरात्री ट्रॅक उडवून मोठा घातपात करू शकतात त्यामुळे रेल्वे रुळा लगत या झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी करणे म्हणजे मुंबई आणि ठाणे पालघर जिल्ह्यातील रेल्वेची सुरक्षा धोक्यात आणण्या सारखी आहे. बरे या बेकायदा झोपड्यांचे मानवतेच्या दृष्टिकोनातून  पुनर्वसन  मनजे अधिकृत कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय आहे. पण त्या झोपड्या आहेत तिथेच ठेवण्याची मागणी करणे चुकीचे आणि बेजबाबदार पणाचे मतांसाठी लाचार नेत्यांची भलावण करणे होय.
       आजही मुंबईच्या कुर्ला, गोवंडी, मानखुर्द ,चेंबूर, माहीम, जी टी बी नगर, वडाळा, घाटकोपर, मुलुंड, किंगसरकल , बांद्रा,संटॅक्रुज, कांदिवली, बोरिवली ,कळवा ,मुंब्रा ठाणे या रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रुळा शेजारी मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. यांतील बांद्रा येथे किंमत एका झोपडीची अंदाजे एक कोटी भावाने विकली जाते. झोपडीदादांचे राकेट असून यामध्ये परप्रांतीयांनी बांगलादेशी यांचा भरणा अधिक आहे. ज्या ज्या वेळेला आंदोलने होतात त्यात्या वेळेला सर्वात प्रथम याच झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक रेल्वे रुळावर उतरतात आणि लोकल सेवा ठप्प करतात वांद्रे येथे तर काही झोपड्या थेट रुलावराच बांधलेल्या आहेत मग या सगळ्या झोपड्या आहेत तिथेच ठेवायच्या का ? जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन मध्ये साखळी बॉम्ब स्फोट झाले होते त्यात शेकडो निरपराध प्रवासी मारले गेले तसा प्रकार भविष्यातही घडू शकतो म्हणूनच रेल्वेच्या सुरक्षेबाबत सरकारने कोणतीही तडजोड करू नये.

रेल्वे रुळाशेजारी असलेल्या झोपड्या वाचवा असे काही पुढारी जी मागणी करीत आहेत त्यामागे बिल्डर लॉबी आहे .कारण या झोपड्या हटवून त्यांना एकीकडे इथल्या झोपडपट्टी वासियांचे अन्यत्र पुनर्वसन करून झोपडपट्टी वासियांची मतेही मिळवायची आहेत आणि मोकळ्या झालेल्या जागा बिल्डरांच्या घशात घालून अफाट पैसाही कमवायचा आहे. अशा दुहेरी फायद्यासाठी काही पुढारी सध्या रेल्वे रुळाच्या लगत असलेल्या झोपडपट्टी वसियांचे तारणहार बनलेले आहेत. मात्र हे एक मोठं कारस्थान आहे आणि या कारस्थनाला केंद्र अथवा राज्य सरकारने बळी पडून  नये मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात घालू नये उलट अशा झोपडपट्ट्यांमध्ये ज्या गुन्हेगारांनी आसरा घेतला आहे त्यांना शोधून काढण्यास पोलिसांना आणि रेल्वे प्रशासनाला मदत करावी तरच मुंबई सुरक्षित राहील.

error: Content is protected !!