ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार


इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी राज ठाकरे, मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत व अन्य यांच्याविरुध्द कोकरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आह
ठाकरे यांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्याची विनंती वकिलामार्फत इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली होती. सरकारी वकिल राजेश पाटील यांनी युक्तीवाद करीत असताना अद्याप साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत, असे सांगत दोषमुक्तीला विरोध दर्शवला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली

error: Content is protected !!