५ ते ६ फेब्रुवारी मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा 30 तास बंद राहणार
मुंबई/पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जल बोगदा दरम्यान मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन 2400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे 1800 मिलिटरी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन 2400 मिलिमीटर वासाची जलवाहिनी कार्य करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान तीस तास मुंबईतील भांडुप पुरला वांद्रे अंधेरी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे मात्र या कालावधीत पालिकेच्या एस एल के पूर्व एच पूर्व आणि जे उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याच्या कालावधीत कातकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून प्यावे असेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे