महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
अहिल्या नगर/महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कधी घडली नव्हती अशी एक भयंकर घटना काल घडली गादीवरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि नांदेडचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील स्पर्धेत पंचांनी चुकीच्या पद्धतीने शिवराज राक्षेला बाद दिल्यामुळे चिडलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली या घटनेने मोठी खळबळ माजली दरम्यान माती आणि गादीवरील विजेत्यांमधील झालेल्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता होऊन महाराष्ट्र केसरी ठरला
गादी वरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या मध्ये सामना झाला पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षेला खाली पाडले पण त्याची पाठ गादीला टेकली नव्हती तरीसुद्धा पंचांनी त्याला बाद केले त्यामुळे शिवराज राक्षे आणि त्याचे समर्थक भयंकर चिडले आणि त्यांनी मैदानात घुसून आरडाओरडा करायला सुरुवात केली तसेच चिडलेल्या राक्षेने व्यासपीठावर जाऊन हा संपूर्ण प्रकार अजित पवाराना सांगितला आणि कुस्ती पुन्हा घेण्याचे तसेच सीसीटीव्हीवर रिव्ह्यू पाहण्याचे मागणी केली परंतु ती मागणी फेटाळण्यात आली या राडेबाजी मुळे काही काळ मैदानात प्रचंड गोंधळ मजला होता दरम्यान मातीवरील कुस्तीत महेंद्र गायकवाड यांनी सुभाष यादव चा पराभव केला त्यामुळे महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना झाला या सामन्यात महेंद्र गायकवाड यांनी दोन विरुद्ध एक ने पिछाडीवर जाताच सामन्यातून माघार घेतली त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित करण्यात आले आणि त्याने महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा आणि गाडी जिंकली मात्र शिवराज राक्षेने पंचांना मारलेल्या लाथेमुळे ही स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली तसेच अनेक पैलवान आणि याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली