ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत


मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश आहे. अजित दादांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे शिवसेना फोडल्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीही फोडली दरम्यान शरद पवार आणि पत्रकार परिषद घेऊन आम्हाला कसलीही चिंता नाही मी लोकांमध्ये जाऊन याबाबत दाद मागणार आहे असे सांगितले त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर काही महत्त्वाचे आमदार अजूनही राष्ट्रवादीसोबतच आहेत असे सांगण्यात आले दरम्यान अजित दादा भाजपासोबत केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना पक्षाचे प्रतोद आणि विरोधी पक्ष नेते करण्यात आलेले आहे अजितदादांच्या या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजलेली आहे तर भाजपसोबत असलेले शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत कारण त्यांना आता मंत्रिपद मिळणे कठीण आहे.

error: Content is protected !!