ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अपूर्ण 16 बंडखोर आमदारांचा -आज फैसला

दिल्ली/महाराष्ट्रात सत्ता संघर्षा वरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून 16 बंडखोर आमदारांच्या अपात्र तेवर दोन्ही कडून युक्तीवाद सुरू आहे मात्र तो काल अपूर्ण राहिल्याने त्यावर आज सुनावणी होऊन फैसला होणार आहे त्यामुळे आजचा दिवस शिवसेना आणि शिंदे गटासाठी खूपच महत्वाचा आहे
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगरल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारी तसेच महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार अवैध ठरवावे अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे तर खरी शिवसेना आमची असून आमच्याकडे 1/३ बहुमत असल्याने आपल्या गटाला मान्यता द्यावी अशी शिंदे गटाची भूमिका आहे त्यासाठी घटनेच्या 10 व्या परिच्छेद चां हवाला दिला जात आहे . मुख्य न्यायधिषांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायधिशांच्या खंडपीठ समोर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून हरीश साळवे युक्तीवाद करीत आहेत कपिल सिब्बल यांच्याकडून बंडखोर आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद केला जात होता . तर आम्ही अजूनही शिवसेना पक्षातच असून शिवसेना सोडलेली नाही असा दावा शिंदे गट करीत होता . यावेळी न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे याना नव्याने लेखी युक्तिवाद तयार करून आणण्यास सांगण्यात आले आज शिवसेना आणि शिंदे गटाकडून दाखल झालेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली मात्र टी अपूर्ण राहिल्याने त्यावर आता आजा सुनावणी होऊन कदाचित उद्याच या प्रकरणाचा फैसला होण्याची शक्यता आहे ‘

error: Content is protected !!