ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका


मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर मंगळवारी सुनावणी आह

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा युक्तिवाद याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. तसेच लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरूणांना कौशल्य विकास करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी बारावी पास तरुणांना प्रति महिना ६ हजार, डिप्लोमा धारकांना ८ हजार आणि पदवीधारकांना प्रतिमहिना १२ हजारांचा भत्ता दिला जाणार आहे. अगोदरच महाराष्ट्र सरकार संकटात असताना अशा खर्चिक योजनांमुळे रराज्यावर आर्थिक बोजा पडणार असल्याने हि योजना बंद करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

error: Content is protected !!