ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चिल्लरांच्या गाड्या काय फोडता फडणवीस , शिंदे , शरद पवार , ठाकरेंच्या गाड्या फोडा ! प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजबच विधान केल्याचे पाहायला मिळाले. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लहान लोकांची गाड्या का फोडता बड्या नेत्यांच्या गाड्या फोडा असं अजब विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. परभणीच्या गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित करत असताना हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर कालपासून परभणी जिल्ह्याच्या विविध भागात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने सभा घेत आहेत. आज गंगाखेड येथे आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले

error: Content is protected !!