ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात

मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेत
दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू झालेत हा वाद सर्वोच्च न्यायालय पर्यंत गेला आहे त्याचा निकाल केंव्हा लागेल तेंव्हा लागेल पण सध्या दसरा मेळाव्या वरून दोन्ही गटातील लोकांची डोकी फुटण्याची वेळ आली आहे कारण उद्धव ठाकरे दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्ये घेण्यावर ठाम आहेत तशी शिवसेनेने पालिकेकडे अर्ज करून परवानगी सुधा मागितली आहे पण आता शिंदे गटा ने सुधा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर च घेण्याचा निर्णय घेतला आहे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यामुळे मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!