ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा


राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी त्यांचे काही खरे नाही कारण फुटिरांवर महाराष्ट्राचा राग आहे .त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत फुटिरांचा काही फायदा होईल असे वाटत नाही त्यामुळे भाजपचे नेते सध्या राज्य ठाकरेंच्या दरबारात हजेरी लावत आहेत. हनुमान चालीसा प्रकरणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली काय रातोरात ते हीरो झाले आणि भाजपवाल्या साठी राज ठाकरेंचे निवस्थान तीर्थक्षेत्र बनले आहे.रोज कुणी ना कुणी भाजप नेता राज ठाकरेंना जाऊन भेटतोय आणि यावेळी तर राज ठाकरेंच्या घरी गणपती आल्याने भेटीसाठी वेगळे कारण देण्याची आवश्यकता नाही .या दर्शन डिप्लोमसी मध्ये मुख्यमंत्र्यांनी तरी का मागे राहावे म्हणून तेही राज ठाकरेंच्या घरी पोचले.राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणे ठीक आहे पण मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री दर्शनासाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण मिलिंद नार्वेकर हे उद्वव ठाकरेंचे निष्ठावान आणि मातोश्री वरचे कारभारी असल्याने त्यांना ठाकरे कुटुंबाची खडानखडा माहिती.अगदी थोरल्या साहेबांपासून धाकट्या आदित्य पर्यंत सगळ्यांच्या जमाखर्चाचा वह्या नार्वेकर यांच्याकडे !

दोन वर्षांनी यंदा प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे त्यामुळे लोकांमधे उत्साह आहे. परिणामी राजकारणी लोकांमधे सुधा उत्साह आहे म्हणूनच राजकारणी बाप्पांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांना तसेच घरगुती गणपतीचे सुधा दर्शन घेत आहेत यात श्रद्धा तर आहेच .पण या श्रद्धेबरोबर राजकीय हेतू सुधा आहेत .मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायची आहे त्यामुळे त्यांना एक मजबूत अशा राजकीय मित्राची आवश्यकता होती मनसे च्या रूपाने ती मिळत असेल तर पालिका निवडणूक जिंकणे अधिक सोपे जाईल पण खरोखरच मनसेचा त्यांना फायदा होईल का ? किंवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी दर्शन डिप्लोमसी राबवली जात आहे टी फायदेशीर ठरेल का हे येणारा काळच ठरवेल .पण शिंदेंच्या बंडा मागे भाजप आहे हे आता नक्की झालेय त्यामुळे बाळासाहेबांवर श्रद्धा असलेला मुंबईतील मराठी माणूस दुखावला गेलाय .त्यामुळे तो या लोकांच्या नादाला लागणार नाही . मुंबईत केवळ 23 टक्के मराठी माणूस आहे जो विविध पक्षामध्ये विभागला गेलाय . शिवाय मनसेची हिंदुत्वाची भूमिका खुद मराठी माणसालाही पटलेली नाही राहता राहिला सर्व परप्रांतीय मतदारांचा तर त्यात निम्मे मुसलमान आहेत . ते चुकूनही भाजपला मतदान करणार नाहीत म्हणूनच भाजपला इतर पक्षांच्या मदतीची गरज आहे .शिंदे गटाकडे मुंबईसाठी एकही चांगला नेते नाही सदा सरवणकर याच्यावर त्याच्या मतदार संघातील लोकांचा राग आहे . तर यामिनी आणि यशवंत जाधव हे जोडपे बेनामी संपत्ती प्रकरणी बदनाम झाले आहे . ही सगळी परिस्थिती आहे म्हणूनच दर्शन डिपोलोमासीचा आधार घेऊन लोकांच्या जवळ जाण्याचा पर्याय केला जातीय पण लोक हुशार आहेत ते आता फसणार नाहीत .

error: Content is protected !!