ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

विसर्जनाच्या कार्यात  कंत्राटदाराकडून जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण ? –

जी – जीर्थ सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि सहायक अभिंयता  इरफान काझी आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकतील काय ? –
मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहतही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार गणेशभक्तांच्या प्रणाशी खेळ करणारा आहे अशी संतप्त प्रितिक्रिया गणेश भक्तांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर करवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबधित अधिकार्‍यानी थातूरमातूर उतरे देवून पळ काढला परतु सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि सहायक अभिंयता इरफान काझी आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकतील काय? जीवरक्षकांचे शोषण होतेय त्यांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्‍न आहे.
गणेशोत्सवात दीड दिवसांचे, पाच दिवसांचे, सात दिवसांचे आणि अकरा दिवसांचे असे गणपती विसर्जन होत असते त्यासाठी ज्या प्रभागाच्या हद्दीत समुद्र चौपट्या येतात तेथे जीवरक्षक ठेवले जातात. यावेळी जी नॉर्थ म्हणजेच दादरच्या किर्ति कॉलेज पासून माहीम पर्यन्त विसर्जनासाठी जीवरक्षक आणि बोटी ठेवण्यात आले होते. त्यांना प्रत्येकी 500 रुपये दिले गेले मात्र सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना जी आवश्यक साधने द्यायला हवी होती . ती सुरक्षा जेकेट आदी दिलेली नव्हती. केवळ भगवे टी शर्ट देण्यात आले होते आणि सर्वात धक्कादायक म्हणजे यातील बरेचसे जीवरक्षक प्रशिक्षित नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जर कुणी बुडाले तर त्यांना हे जीवरक्षक कसे वाचवणार . (मागील वषी वर्सोवा येथे 3 जण बुडाले ) कारण विसर्जनाच्या वेळी मानसे बुडण्याच्या अनेक घटना घडतात आणि त्या रोखण्यासाठी तर जीवरक्षक नेमतात .
     महेश नावच्या एका व्यक्तीकडे जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट- -यावेळी महेश नावच्या अगाऊ व्यक्तीकडे जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट आहे. तो जीवरक्षकांना पैसे तर कमी देतो पण अशा काही लोकांची भरती केली ज्यांना समुद्रात पोहण्याचा अनुभव किंवा प्रशिक्षण नाही त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली  तर जीवरक्षकच प्रशिक्षित नसल्याने किती मोठी हानी होईल याचा विचार पालिकेने करावा तसेच जीवरक्षक विमाबाबत भूलभुलैया असल्याचे कळते. 
      सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी घनकचरा विभाग अभिंयताचा सावळागोंधळ कारभाराची घेतली दखल –
  याबाबत आमच्या प्रतिनिधीने प्रभागातील जी-उत्तरचे सहायक अभिंयता (पर्यावरण) इरफान काझी  याच्या कार्यालयात दिंनाक 2 सप्टेबर 2022 रोजी भेट दिले असता. भेट झाली पण  त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले . तर  गडरे नावाचे  अभिंयता  जबाबदारी असताना करतात काय ? असा प्रश्न पडतो .
      याच दिवशी  सहायक आयुवत प्रशांत सपकाळे यांची भेट घेतली असता त्यांनी संबधित अभियता काझी यांना कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश देतो असे सांगितल.

जीवरक्षकांचे शोषण कोण थांबविणार ?
चार दिवसाच्या कार्यकाळात जीवरक्षकांना सपूर्ण विर्सजण काळात चार वेळा,आठ तासाच्या कार्यकाळाचा अंदाजे 750 जीवरक्षक पुरविण्याचा कंत्राट अंदाजे लाखो रूपयाचे  काढण्यात आल्याची माहीती अधिकार्‍यानी दिली. परतु एका जीवरक्षकांला किती मोबदला दयावा आणि विंमा अटबाबत  ठोस माहीती देण्यास नकार देतात. यामुळे कदाचित जीवरक्षकांचे शोषण  वर्षानुवर्ष चालू आहे ते अधिकार्‍याच्या संगनमताने या पुढे चालू राहणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

     मागील वर्षी  गणेशोत्सवात जीवरक्षकांचे शोषण झाले ते आताही चालू –
मागील वर्षी  गणेशोत्सवात 2021 रोजी जीवरश्रकाचा प्रश्‍न मुंबई जनसत्ताने मांडला त्यावेळी अभिंयता  गडरे त्यांनी टेडर संबधित जीवरक्षकांना न्याय देण्याच्या ऐवजी कंत्राटदाराचे प्रश्‍न मांडून कारवाईची टाळाटाळ केली. याबाबत प्रभागसमिती अध्यश्र टी. जगदीश यांची भेट घेतली असता संबधित अभिंयताकडून  माहीती घेऊन संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले तर प्रभागाचे त्यावेळेचे सहायक आयुक्त किरण दिंघावकर चाललेला सावळागोंधळावर कारवाई न झाल्याने  जनतेत आश्‍चर्य व्यक्त केले .
    गडरे यांची हकालपट्टी करा
   या कामावर मागील वर्षा पासून गडरे नावांचा अभिंयता काम पहात असून कंत्राटदाराच्या विरोधात तक्रार येऊनही कंत्राटी कामात सुधारणा करण्यात अक्षम ठरलेले अभिंयताना त्या नामावर पुन्हा नेमतात कसे ? जनतेचा पैशाचा गैरवापर होत असतांना हे अभियंता पहात कसे बसतात ? या कंत्राट कामावरचे गडरे यांची हकालपटी करून चौकशी झाली पहिजे अशी मागणी मुंबई जनसताची आहे.

error: Content is protected !!