ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लालबागमध्ये बेस्ट बसच्या धडकेत ९ जखमी एकाचा मृत्यू

.
मुंबई – लालबागच्या गणेश सिनेमा जवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला ६६ क्रमांकांच्या बसमध्ये एका दारुड्या प्रवाशाबरोबर चालकाचे भांडण झाले यावेळी चालू बसमध्येच दारुड्याने बस चालकाला धक्का दिल्याने त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले व बस पब्लिक मध्ये गुसळि या अपघातात एका महिलेचं मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहेत या प्रकरणी दारुड्या प्रवाशाला काळाचौकी पोलिसांनी अटक कलेची आहे

।बेस्टची ६६ क्रमांकाची बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेअरिंग हिसकावून घेतलं, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
एका अधिकाऱ्यानं दि लेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची वाहतूक शाखा आहे. मद्यधुंद प्रवाशानं केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक बसली. काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली

error: Content is protected !!