देशावर ब्लॅक आऊट चे संकट
मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे