ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टी वर छापा-शाहरुख खानच्या गरदुल्ल्या मुलासह ८जणांना अटक

मुंबई)/ गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर परदेशातून पाठवलेले जे अमली पदार्थ पकडले जात होते ते कोणासाठी येत होते याचा आता काही प्रमाणात उलगडा झाला आहे .एन सी बी ने मुंबईच्या समुद्रात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टी वर धाड टाकून अमली पदार्थांची नशा केलेल्या अनेक बड्या आसमिना ताब्यात घेतले आहे .त्यात अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन यांच्यासह दिल्लीतील काही बड्या व्यापर्यांचाही समावेश होता या पैकी आर्यन सह ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेत.
मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती मिळताच एन सी बी चे अधिकारी प्रवासी बनून तिथे गेले आणि त्यांनी रेड केली या रेड मध्ये अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तीन महिलाही सापडल्या या क्रुझवार एकूण१५०० लोक होते .त्या सर्वांची झडती घेण्यात आली असता अनेकांकडे अमली पदार्थ सापडले

error: Content is protected !!