पितृ पंधरवड्या मुळे भाज्या कडाडल्या -गृहिणींचे बजेट कोलमडले
मुंबई/एकीकडे जनता महागाईने त्रासलेली असताना पितृपंधरवडा मुळे भाज्यांचे दर आकाशाला भेटले आहेत परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहे
सध्या भाजी मार्केटमध्ये वाटाणा दीडशे रुपये किलो गवार दोनशे रुपये किलो कारले 80 रुपये किलो तर भेंडी शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे त्यात कांद्याचे लिलाव थांबल्यामुळे कांद्याचे दर ही कडाडले आहेत कांदा सध्या 50 ते 60 रुपये किलो दराने मार्केटमध्ये विकला जात आहे त्यामुळे जनता आणखीनच त्रस्त झालेली आहे एकीकडे पावसाच्या अनियमिततेमुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भाज्यांचे लिलाव थांबलेले असल्याने मुंबई नवी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये भाज्यांची आवक कमी झालेली आहे आणि आवक कमी झाल्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत