सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियान आत्महत्या प्रकरण-आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई/सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयने व्यवस्थित तपास केलेल्या नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अशील संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे या याचीकेत त्याने सीबीआयच्या तपासावर ही बोट ठेवलेला आहे सीबीआयने अत्यंत धीम्या गतीने तपास केल्या ने या प्रकरणाचा अत्यंत धीम्या गतीने तपास केला असा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दिशा सलियांच्या आत्महत्येच्या वेळी त्या परिसरातील शंभर मीटरच्या रेंजमध्ये आदित्य ठाकरे अरबाज खान सुरज पंचोली तसेच रिया चक्रवर्ती यांचे मोबाईल ऍक्टिव्हेट होते त्यामुळे या मोबाईल मधले संभाषण तपासले जावे तसेच आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यामधील 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले ही माहिती ही तपासली जावी अशी या याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची लवकरच सुनावणी होणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.