फटके फोडण्यावरून झाला वादनिरपराध तरुणाचे आयुष्य झाले बाद
मुंबई – आजकालच्या तरुणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात . मात्र हे वाद तत्काळ मिटवले जात नसल्याने या वादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अँटॉप हिलमध्ये अशाच एका घटनेत फाटक्या वरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला . या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे .
शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून आरोपी कार्तिक आर. मोहन देवेंद्र याने दुसरीकडे फटाके फोडण्यास सांगितले. त्यावरून फटाके फोडणाऱ्यांचा कार्तिक सोबत वाद झाला. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला पण, कार्तिक तिथून निघून गेला.
थोड्या वेळानंतर कार्तिक त्याची पत्नी, भाऊ आणि इतर काही लोकांसोबत तिथे आला. त्यांच्याजवळ काठ्या, क्रिकेट बॅट होती. त्यानंतर दोन्ही गटात वाद सुरू झाला. वाद सुरू असतानाच कुणीतरी चाकू काढला. झटापटीत चाकू खाली पडला. कार्तिक सोबत आलेल्या राज पुट्टी याने चाकू घेतला आणि विवेक गुप्तावर वार केले.
परिसरातील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमी विवेक गुप्ताला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विक्की मुत्तू देवेंद्र, मिनियप्पन रवी देवेंद्र आणि कार्तिकची पत्नी यांना पोलिसांनी अटक केली.
।