ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हे सगळ इथल्या राज्यकर्त्यांना कधी कळणार ?

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बंनल्यापासून गुजरातला अच्छे दीन आले आहेत कारण केंद्रातील सरकारचे गुजरातच्या भरभराटी कडे अधिक लक्ष आहे. इतकेच काय देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचीही कटकारस्थाने सुरू आहेत.तसा प्रत्येकाला त्याच्या प्रंताबद्दल आणि तिथली भाषा तसेच संस्कृतीबद्दल अभिमान असतोच! पण त्यात दुटप्पीपणा कशासाठी? राज ठाकरे मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल बोलले की ते प्रांतवाद आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेऊन मोदींचे भाजपा वाले त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे आणि राष्ट्र भक्तीचा उपदेश करतात पण आज मोदी आणि अमितशहा जे काही गुजरात साठी करीत आहेत तो प्रांतवाद नाही का ? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट! ही जी काही वृत्ती आहे टी बरोबर नाही.कालपासून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबई दौऱ्यावर आहेत.आणि सकाळपासूनच उद्योगपतींच्या भेटीगाठी घेत आहेत त्यामुळे त्यांचा उद्देश काही ठीक दिसत नाही.यापूर्वी आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री असताना मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी इथल्या व्यापारी वर्गाला मुंबईत काय ठेवलंय गुजरातला चला असे आवाहन केले होते.इतकाच नाही. तर मुंबईची बदनामी करताना इथले ट्रॅफिक,सुरक्षा,आणि पायाभूत सुविधांवर सुधा टीका केली होती भूपेंद्र पटेल हे सुधा महाराष्ट्रापेक्षा गुजरात किती सेफ आहे ते व्यापाऱ्यांना पटवून देत असावेत आणि त्यांना गुजरातला चलण्याचा आग्रह करीत असावेत.त्यांचा हा प्रयत्न एक मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे कारण आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग धंदे यावेत त्यातून गुजरातची भरभराट व्हावी असे त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे .पण मग आमचे राज्यकर्ते आणि इथले भाजपचे नेते काय करतायत.मुख्यमंत्री समजा आजारी आहेत .पण उप मुख्यमंत्री तर चांगले बिनरोगी आहेत ते का नाही जात गुजरात किंवा इतर राज्यात शेवटीं
महाराष्ट्रालाही गुंतवणूक हवीच आहे पण त्यासाठी इथले राज्यकर्ते काही करताना दिसत नाहीत? मुख्यमंत्र्यांना इथलीच लफडी मिटवता फुरसत नाही तर ते भारतभर काय फिरणार आणि उपमुख्यमंत्री हे जणू पुणे आणि पिंपरी चिंचवडचे राष्ट्राध्यक्ष असल्या प्रमाणे त्याच भागावर लक्ष ठेऊन आहेत.हे सगळ भयंकर आहे .उद्या जर समजा भूपेंद्र पटेल यांनी इथल्या उद्योजकांना फुस लाऊंन गुज्ररात मध्ये नेले तर काय करणार शेवटी बहुतेक व्यापारी हे गुजराती असल्याने त्यांनाही त्यांच्या प्राण्याबद्दल आत्मीयता असणारच पण हे सगळ इथल्या राज्यकर्त्यांना कधी कळणार?

error: Content is protected !!