ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या जागेवर होणार पोलीस वसाहती

मुंबई -बीडीडी चाळीतील छोट्याशा जागेत राहणाऱ्या पोलीस बांधवांसाठी सध्या वरळी ,डिलाई रोड आणि नायगाव भागात होणाऱ्या म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका मिळणार आहेत. मात्र पोलिसांची संख्या पाहता या प्रकल्प अपुरा ठरू शकतो म्हणूनच आता एसटी महामंडळाच्या जागेवर पोलीस वसाहती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांसाठी हि आनंदाची बातमी आहे.

एसटी महामंडळाच्या शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागांवर पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाने याबाबत राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महामंडळाकडून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र लिहण्यात आले आहे. “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे, असे महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.

13 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांची याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत एसटी महामंडळाच्या रिक्त जागेत पोलिस वसाहती बांधण्याबाबत विचार झाला होता. मुख्य सचिवांनी त्यावेळी याबाबतचा आढावा घेतला होता. त्यानुसार आता एसटी महामंडळाच्या जागेत पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत.
“कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी कळविल्यानुसार 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. आपल्या विभागाच्या रिक्त जागेचा एस. टी. महामंडळाच्या प्रयोजनार्थ आणि भविष्यातील वाहतुकीची निकड लक्षात घेऊन राखीव ठेवण्यात याव्यात, तसेच उर्वरित रिक्त जागा पोलिस वसाहती बांधण्यासाठी उपलब्ध करून देता येईल किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी.” असे राज्य परिवहन महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.

error: Content is protected !!