ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांना लवकरच निरोपाचा नारळ

मुंबई – हातात वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्रातील जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर उचलबांगडी होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे

भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटलेत. विरोधी पक्षानं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनेही केलं. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप खासदार उदयनराजे यांनी तर मी हतबल झालो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलीय. पण केंद्रीय नेतृत्व गुजरातच्या निवडणुकीत व्यस्त असल्यानं आठ डिसेंबरनंतरच राज्यपालांचं काय होणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतरही कारवाईचा ‘क’ ही उच्चारला जात नसल्यानं उदयनराजेंनी शिवसन्मान कार्यक्रम हाती घेतला आहे. ते समर्थकांसह रायगडाकडे निघालेत. उद्या ते आपली वेदना रायगडावर व्यक्त करणार आहेत. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंदोलनं केली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं होतं. भाजप नेत्यांनी समर्थनाचा प्रयत्न केला, पण लोकभावना लक्षात घेऊन त्यांनीही यू टर्न घेतला. आता छत्रपतींचे वंशज आक्रमक भूमिकेत असल्यानं विरोधकांना राज्यपालांवरील कारवाईचं श्रेय किती मिळेल याबाबत शंका आहे.

राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी महात्मा फुलेंबद्दल त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर छत्रपतींबद्दल बोलताना ते घसरले.
त्यामुळे महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमानाची भावना ठळक झाली.ज्याचा निकाल गुजरात निवडणुकीसोबतच लागेल अशी अटकळ बांधली जातेय.

error: Content is protected !!