ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

शिंदे सरकारला मोठा दणका आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयालाच स्थगिती

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वाटेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या विकासकामांच्या निर्णयांना स्थगिती दिली होती . मात्र त्यांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्चं न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिदें सरकारला हा मोठा धका आहे .
न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला दणका मानला जातो. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मंजूर झालेली हजारो कोटींची कामे रखडणार होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी हायकोर्टात दाद मागितली होती.

शिंदे सरकाने महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण करून वर्कऑर्डर निघलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकास विभागानं 19 जुलै आणि 25 जुलै 2022 रोजी महाविकास आघाडीच्या काळात निविदांना स्थगिती दिली होती. आणि त्याच निर्णयाला आता हायकोर्टाने स्थगिती दिली आहे .

error: Content is protected !!