ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका ७ ठिकाणी जलतरण तलाव बांधणार

मुंबई – सध्या मुंबईत सात ठिकाणी जलतरण तलाव असतानाही मुंबई महापालिकेने मुंबईत आणखी ७ जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतल्याने हि उधळपट्टी कशाला असा संतप्त अवलं मुंबईकर विचारीत आहेत

दहिसर येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या सात ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्यात येणार आहेत. यापैकी वडाळा येथील अग्निशमन केंद्रातील जलतरण तलाव हा सध्या अग्निशमन केंद्राच्या अखत्यारित असून येत्या काळात नूतनीकरण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
सध्या कार्यान्वित असलेल्या चार तरण तलावांची सभासद संख्या वाढवण्यात आली आहे. दादर पश्चिम परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ७०० वार्षिक सभासद व ८२५ त्रैमासिक सभासद, चेंबूर पूर्व परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ३५० वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद, दहिसर पूर्व परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव यासाठी ३३० वार्षिक सभासद व २७५ त्रैमासिक सभासद आणि कांदिवली पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी २,१७८ वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद इतक्या ऑनलाईन सभासदत्वासाठी ३ जानेवारीपासून ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी सुरू होणार आहे.

error: Content is protected !!