ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस


मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.
माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या तक्रारीनंतर २७६ पैकी २५० अतिक्रमण केलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली होती उर्वरित घरांवरील कारवाई सुरु आहे पण आता या लोकांना विनामूल्य सदनिका दिल्या जाणार आहेत यापैकी १७५ जणांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून तर उर्वरित जणांना म्हाडा घरे बांधून देणार आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर गडाच्या दुरुस्तीचे काम महापालिका करणार आहे वास्तविक गड किल्ल्यांची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे येते . त्यामुळे इथे होणाऱ्या अतिक्रमणाला पुरातत्व विभाग जबाबदार आहे असे असताना अतिक्रमण करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिका कशासाठी घेते तेच कळत नाही . अतिक्रमण करणार्यांना मुंबईकरांच्या घामाच्या पैशातून घरे का मुंबईत मूंबईच्या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा लाखो झोपड्या आहेत त्या झोपडीधारकांनी कोणाची परवानगी घेऊन बांधलेल्या नाहीत असे असताना एवढ्या सगळ्या झोपड्यानं झोपू योजनेतून पक्की घरे दिली जाणार आहेत . मुंबईकरांच्या घामाच्या पैशाचा अशा तर्हेने चुराडा का असा संतप्त सवाल मुंबईकर करीत आहेत .

error: Content is protected !!