ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
उपनगरातील 200 शाळा आणि 6 हजार खेळाडूंचा सहभाग

मुंबई – पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला आहे. या महोत्सवात कबड्डी खो-खो मल्लखांब या मराठमोळ्या खेळांसह अथलेटिक्स बुद्धिबळ कराटे टेनिस जलतरण आणि तिरंदाजी अशा विविध खेळांचाही समावेश असल्यामुळे या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शालेय क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रबोधन आमचे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रबोधन क्रीडा भवन येथे आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा क्रीडा महोत्सवांना शालेय खेळाडूंनी मोठ्या संख्येने आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे आणि खजिनदार रमेश इस्वलकर तसेच शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तीकर, माजी नगरसेवक स्वप्नील टेम्बवलकर , राजू पाध्ये , समीर देसाई यांच्यासह प्रबोधन गोरेगावचे कार्यकारी सदस्य व सल्लागार सदस्य उपस्थित होते.

प्रबोधन गोरेगावच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे यंदाचे 43वे वर्ष आहे यंदाच्या क्रीडा महोत्सवात वांद्रा ते दहिसर या भागातील सुमारे 200 शाळा सहभागी झाल्या आहेत या शाळांमधील 6000 विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी आहेत आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. अशा शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!