देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त
मुंबई -मुंबई पोलीस दलात विशेष पोळी आयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले असून पोलीस दलातील जेष्ठ आयपीएस अधिकारी देवें भरती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे
भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी ‘मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त’ ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एक अधिकाऱ्याने दिली. राज्याच्या गृह विभागाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच, मुंबई पोलिस दलात विशेष पोलिस आयुक्त पद सुरू केले असून देवेन भारती यांची प्रथम विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर काही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, “अपर पोलीस महासंचालक’ दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील “संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पदाला “विशेष पोलीस आयुक्त” असे संबोधण्यात येणार आहे. विशेष पोलीस आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या यांच्या अधिपत्याखाली असणार आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार सर्व पोलीस सहआयुक्त हे देवेन भारती यांना रिपोर्ट करणार आहेत. तर, विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करणार आहेत.