फेरीवाल्यांसाठी पालिकेच्या इतक्या पायघड्या कशाला? भूमिगत बाजार मुंबईकरांच्या मानेभोवतीचा फास बनू शकतो
मुंबई – महापालिका नेमकी कोणासाठी आहे. करदात्यांसाठी की मोकळ्या जागा अडवून नागरिकांसाठी अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांसाठी याचे पालिकेने उत्तर द्यायला हवे. मुंबईतील सीएसटी ,चर्चगेट पासून दहिसर ठाणे आणि मानखुर्दपर्यंत पसरलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांची कब्जा केलेला आहे. फेरीवाल्यांची फूटपाटवर तर कब्जा केलाच पण अर्धे रस्तेही ताब्यात घेतलेत . त्यामुळे मुंबईकरांना रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे फुटपाथ आणि रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करायची सोडून पालिका त्यांच्यासाठी भूमिगत बाजार तयार करणार आहे. मुंबईतील बहुतेक फेरीवाले युपी, बिहार आणि रोहिंगे इतर परराज्यातून मुंबईत आले आहेत. त्यांची पोलिसांकडे कोणतीही नोंद नाही. असे असताना त्यांना भूमिगत बाजार बनवून दिले तर या भूमिगत बाजारात ते शास्त्र किंवा अन्य बेकायदेशीर मालाची साठवण करू शकतात . तसेच फरारी गुन्हेगारांसाठी हे भूमिगत बाजार कापण्याची ठिकाणे बनतील. या भूमिगत बाजारात दारू, गांजा चरस आणि वेश्या व्यवसायही सुरु होऊ शकतो. कारण उघड्यावरच्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर पालिका अनुज्ञापन अधिकारी कारवाई करीत नाहीत तर भूमिगत बाजारात पोलिसांच्या नजरेआड चालणाऱ्या घडामोडींकडे पालिका किंवा पोलीस काय लक्ष देणार . एकमात्र खरे कि पालिका अनुज्ञापन अधिकाऱ्यांना हप्ते घेण्यासाठी हे भूमिगत बाजार उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळेच भूमिगत बाजारांसाठी पालिका अधिकारी उत्सुक आहेत. मात्र या भूमिगत बाजारात मुंबईकरांचा ठाम विरोध आहे
फेरी वाल्यांना भूमिगत बाजारासाठी मुंबईतील मोक्याचे ठिकाण असलेल्या दादर, सायनची निवड केली आहे. येथील दोन मैदानांची पाहणी पालिकेने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे ही संकल्पना अंमलात यावी, यासाठी महापालिकेचे अनुज्ञापन अधिकारी पुढच्या आठवड्यात दिल्लीतील कॅनॉट प्लेसलाही भेट देऊन पाहणी करणार आहेत.
मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचा विळखा असल्याने याविरोधात पालिकेच्या वॉर्डकडेही तक्रारी केल्या जातात. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक हद्दीत, तर हे नित्याचेच आहे. रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्यासाठी स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत पण कारवाई होत नाही . आणि आता भूमिगत बाजारामुळे मुंबईच्या जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे