ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बोर्डाकडून चौकशीचे आदेश


बुलढाणा-सध्या महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु आहे . यावेळी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने कायदे कठोर केले आहेत असे असतानाही बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर परीक्षाफुटला . परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला.
गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, या संदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातही बोर्डाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाण्यात गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पेपर कुठल्या केंद्रावर लीक झाता हे अद्याप स्थळ समजले नाही. पण याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तर बोर्डानी मात्र पेपर फुटीची बातमी फेटाळली पण आता मात्र चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

error: Content is protected !!