ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उमेशपाल हत्याकांडात बाहुबली अतिक अहमदचा हात ? आरोपीच्या घरांवर योगी बाबांचा बुलडोझर


प्रयागराज – बसपा आमदार राजू पाल याच्या हत्या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. त्याच्या सोबत त्याच्या चलकाचीही हत्या झाली आहे या हत्याकांडात सध्या साबरमती तुरुंगात बंदिस्त असलेल्या बाहुबली माफिया अतिक अहमद याचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि भावाला अटक केली आहे. तर मुलाचा शोध सुरु आहे. त्याच बरोबर या हत्याकांडात सामील असलेल्या ड्रॉयव्हरचे पोलिसांनी नुकतेच नेहरू पार्कमध्ये एंकॉउंटर केले. या प्रकरणात एकूण ७ आरोपी आहेत. त्यातील एकाचे एन्काउंटर झाले अजून ६ जण तसेच त्यांचे अन्य साथीदार फारर आहेत .त्यामुळे योगी सरकारने या सर्व आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची कालपासून अंमलबजावणी सुरु झालेली आहे. अतिकच्या काही जवळच्या नातेवाईकांच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांची घरे पाढण्यात आली आता इतर आरोपींची घरे बुलडोझरने पाढली जाणार आहेत.

error: Content is protected !!