अबकी बार भाजप तडीपार – उद्धव ठाकरेंची नवी घोषणा
मुंबई – भाजपाने केवळ शहराची आणि स्थानकांची नावे बदलल्या पलिकडे काही केले नाही. त्यावेळी भाजपाने अच्छे दिन आएगे असा नारा होता. पण अच्छे दिन काही आले नाहीत. तो एक जुमला होता. आता भाजपा गॅरंटी देत आहे. हा एक जुमलाच आहे. आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होता. आता दिल्लीचेही तख्त फोडावे लागेल, आता अब की तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल. कसे चारशे पार जाता हे पाहातो अशी डरकाळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी धारवी येथील सभेत फोडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोषणा अब की बार..त्यापाठोपाठ कार्यकर्त्यांनी तडीपार असा प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होते. जाहीर सभेतून, त्यापैकी किती आले. आले असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत येतो असेही ते म्हणाले. आता मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केले नाही. आता जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवली आहे. भ्रष्टाचार करा. भाजपमध्ये या तुमचे वाकडे होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याची टीका ठाकरे यांनी केली